भरधाव बसची धडक ; दोन मजूर महिला ठार देऊळगाव राजा येथील घटना

देऊळगाव राजा : मजुरीसाठी आलेल्या दोन महिलांवर काळ कोसळला.  मालवाहू वाहनात चढत असलेल्या मजूर महिलांना भरधाव एसटी बसने दिलेल्या धडकेत दोन महिला जागीच ठार तर पाच महिला गंभीर जखमी झाल्या.  ही धक्कादायक घटना देऊळगाव राजा येथे ११ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. 

देऊळगाव राजा : मजुरीसाठी आलेल्या दोन महिलांवर काळ कोसळला.  मालवाहू वाहनात चढत असलेल्या मजूर महिलांना भरधाव एसटी बसने दिलेल्या धडकेत दोन महिला जागीच ठार तर पाच महिला गंभीर जखमी झाल्या.  ही धक्कादायक घटना देऊळगाव राजा येथे ११ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. 

 मायाबाई सुरज काजले (जि. बुरहानपूर), रिचा कासदेकर (जि. अमरावती) असे ठार झालेल्या महिलांची नावे आहेत.  परराज्यातून तसेच अमरावती जिल्ह्यातून अनेक महिला मजूर देऊळगाव राजा येथील कापूस जिनिंगमध्ये कामासाठी येतात. त्यापैकी काही महिला पिंपळगाव येथे कापूस वेचण्यास जाण्यासाठी मालवाहू पिकअप (एमएच 38ई 2082) मध्ये चढत होत्या. त्याचवेळी जाफराबाद–जालना मार्गावरून येणाऱ्या एसटी बस (एमएच  20 बीएल 2276) ने पिक अपला मागून जबर धडक दिली. यात मृत महिलांचे शरीर अक्षरशः क्षत-विक्षत झाले. स्थानिक  डॉ. अक्षय गुठे, चालक सुभाष कणखर आणि समाधान आघाव यांनी याबाबत माहिती दिली.

जखमींची प्रकृती चिंताजनक

गंभीर जखमी महिला – सुहाना प्रतिराम इपने (जि. अमरावती),  खुशबू बबलू पालवी (जि. बुरहानपूर), सुलोचना सहारे (जि. अमरावती),  पुरुषाने इपने(जि. अमरावती),  नर्मदा सोनू इपने (जि. अमरावती) अशी जखमी महिलांची नावे  आहेत. जखमी महिलांना प्रथम देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जालना येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले असून सर्वांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. देऊळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपासांत गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे निरीक्षक ब्रम्हागिरी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »