dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

स्ट्राँग रुमच्या निगराणीसाठी आठ अतिरिक्त कॅमेरे  बसविणार : निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांची माहिती

बुलढाणा:  बुलढाणा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ डिसेंबरला मतदान झाल्यानंतर ईव्हीएम आणि टपाल मतपत्रिका पालिका इमारतीत तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या. पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या  निगराणी खाली स्ट्रॉंग रूमची सुरक्षा असताना, काही उमेदवार प्रतिनिधींकडून पाच कॅमेरे बंद असल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आज सकाळीच उमेदवारांना बोलावून घेत स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेची माहिती दिली. 

बुलढाणा:  बुलढाणा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ डिसेंबरला मतदान झाल्यानंतर ईव्हीएम आणि टपाल मतपत्रिका पालिका इमारतीत तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या. पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या  निगराणी खाली स्ट्रॉंग रूमची सुरक्षा असताना, काही उमेदवार प्रतिनिधींकडून पाच कॅमेरे बंद असल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आज सकाळीच उमेदवारांना बोलावून घेत स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेची माहिती दिली. सगळी सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित असल्याचे सांगत, पाच कॅमेरे बंद असल्याच्या आरोपाचे त्यांनी खंडन केले. ते म्हणाले,  16 चा डीव्हीआर आहे. त्यातील 11 कॅमेरे लावण्यात आले आहेत तर पाच कॅमेरे लावले नसल्या कारणामुळे स्क्रीनवर ते बंद दिसत आहेत.  इतकेच नाही तर, उमेदवारांना सोबत नेऊन स्ट्रॉंग रूम बाहेर अतिरिक्त आठ कॅमेरे बसवण्याची जागा निश्चित करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top