dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

ख्रिसमस’ निमित्त क्राईस्ट चर्चमध्ये विशेष प्रार्थना

छत्रपती संभाजीनगर :  शहरात ‘ख्रिसमस’ (नाताळ) गुरुवार, 25 डिसेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. ख्रिसमसनिमित्त शहराच्या विविध भागातील चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ख्रिसमसनिमित्ताने छावणी परिसरातील क्राईस्ट चर्च येथे विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते.

दरवर्षीप्रमाणे उत्तर भारतीय ख्रिस्ती महामंडळांतर्गत मराठवाडा धर्मप्रांतातर्फे ख्रिस्त जयंती गुरुवारी उत्साहात साजरी करण्यात आली. नाताळ सणानिमित्ताने छावणी परिसरातील क्राईस्ट चर्च येथे शुक्रवार, 19 डिसेंबर रोजी पासून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. क्राईस्ट चर्च येथे झालेल्या विशेष प्रार्थना सभेत धर्मप्रांताचे महागुरू रा. रेव्ह. बिशप प्रकाश डी. पाटोळे यांनी ख्रिस्ती समाज बांधवांना नाताळ सणानिमित्ताने मार्गदर्शन करीत संदेश दिला. यावेळी क्राइस्ट चर्चचे प्रिस्ट-इन-चार्ज रेव्ह. एस. वाय. घुले यांनी प्रार्थनेचे संचालन केले. याप्रसंगी प्रिस्ट-इन-चार्ज रेव्ह. एस. वाय. घुले, सेवानिवृत्त बिशप एम. यू कसाब, धर्मप्रांताचे उपाध्यक्ष रेव्ह. एस. एस. खंडागळे, सचिव जेम्स अंबिलढगे, खजिनदार डॅनिएल अस्वले, बिपीन इंगल्स, पत्रकार राजू पडवळ, सुशीला श्रीसुंदर, शामला शिंदे, प्रदीप ताकवाले, स्मिथ ऑलिव्हर यांची उपस्थिती होती. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top