बौद्ध स्मशानभूमी, वाचनालयाची नोंद ग्रामपंचायत रेकॉर्डला घ्या

लासूर स्टेशन :  फतियाबाद येथील ग्रामपंचायत हद्दीतील बौद्ध स्मशानभूमीची जागा आहे, त्या जागेची ग्रामपंचायत कार्यालयात नमुना नंबर आठ ला नोंद आहे परंतु ती कमी पडत असल्याने पुन्हा तिच्यात वाढ करून फेर दुरुस्ती करण्यात यावी. 

लासूर स्टेशन :  फतियाबाद येथील ग्रामपंचायत हद्दीतील बौद्ध स्मशानभूमीची जागा आहे, त्या जागेची ग्रामपंचायत कार्यालयात नमुना नंबर आठ ला नोंद आहे परंतु ती कमी पडत असल्याने पुन्हा तिच्यात वाढ करून फेर दुरुस्ती करण्यात यावी. तसेच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (गुरु-शिष्य) यांच्या वाचनालयाची नियोजित जागा साठे नगर येथे असून त्या जागेची ग्रामपंचायत नमुना आठ या रेकॉर्डला नोंद घेण्यात यावी अशी मागणी आविष्कार पोलिस मित्र, माहिती अधिकारी व पत्रकार संरक्षण संघटनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य बबन साठे यांनी निवेदनाद्वारे ग्रामपंचायत अधिकारी एच.एन. सपकाळ यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »