राजस्थानमध्ये सरकारी शाळेची इमारत कोसळल्याने सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू

झालावाड (राजस्थान) : राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यात शुक्रवारी एका सरकारी शाळेच्या इमारतीचा भाग कोसळल्याने सहा मुलांचा मृत्यू झाला आणि २९ जण जखमी झाले. पोलिसांनी ही माहिती दिली.

झालावाड (राजस्थान) : राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यात शुक्रवारी एका सरकारी शाळेच्या इमारतीचा भाग कोसळल्याने सहा मुलांचा मृत्यू झाला आणि २९ जण जखमी झाले. पोलिसांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातील मनोहरथाना ब्लॉकमधील पिपलोडी सरकारी शाळेत मुले सकाळच्या प्रार्थनेसाठी जमली असताना ही घटना घडली. सकाळी ७:४५ च्या सुमारास पोलिसांना माहिती देण्यात आली.

शिक्षक आणि ग्रामस्थांच्या मदतीने मुलांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. मनोहरथाना पोलिस स्टेशनचे प्रभारी नंद किशोर यांनी सांगितले की मृतांपैकी पाच जणांची ओळख पटली आहे, कुंदर, कान्हा, रायदास, अनुराधा आणि बादल भिल अशी  नावे आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की घटनेच्या वेळी इमारतीत सुमारे ३५ विद्यार्थी उपस्थित होते. डांगीपुरा पोलिस स्टेशनचे प्रभारी विजेंद्र सिंह यांनी सांगितले होते की, सहावी आणि सातवीच्या वर्गाचे छत कोसळल्यानंतर इमारतीचा काही भाग कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेतील मृतांबद्दल शोक व्यक्त केला.

मोदींनी एक्स वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “राजस्थानातील झालावाड येथील शाळेतील अपघात अत्यंत दुःखद आहे. या दुःखाच्या वेळी माझ्या संवेदना बाधित विद्यार्थ्यांसोबत आहेत.” त्यांनी म्हटले आहे की, “जखमींना लवकर बरे व्हावे, अशी मी प्रार्थना करतो. अधिकारी पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहेत.” राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनीही अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री शर्मा यांनी एक्स वरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, “झालावाड येथील पिपलोडी येथे शाळेचे छत कोसळल्याने झालेली दुर्दैवी दुर्घटना अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. जखमी मुलांवर योग्य उपचार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »