Shivshahi bus accident in Gondia: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एमएसआरटीसी) शिवशही बस शुक्रवारी दुपारी गोंदिया जिल्ह्यात उलटून झालेल्या भीषण अपघातात झाल्याची घटना घडली. या अपघतात तब्बल 12 प्रवाशांचा मृत्यू, 16 जण जखमी झाले आहेत.
गोंदिया : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एमएसआरटीसी) शिवशही बस शुक्रवारी दुपारी गोंदिया जिल्ह्यात उलटून झालेल्या भीषण अपघातात झाल्याची घटना घडली. या अपघतात तब्बल 12 प्रवाशांचा मृत्यू, 16 जण जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीचा हवाला देत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शिवशाही बस 36 प्रवासी घेऊन भंडारा येथून गोंदिया जिल्ह्याच्या दिशेने जात होती, मात्र दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना सदकार्जुनी तालुक्यातील डव्वा गावात बस उलटली. दुपारी 12.30 च्या सुमारास झालेल्या या अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 16 जण जखमी झाले. अधिकाऱ्याने सांगितले की, जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.