Sexual abuse of young woman: लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारीवरून शेगाव पोलिसांनी अकोला जिल्ह्यातील एका युवकाविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
शेगाव: प्रेम संबंध प्रस्थापित करत लग्नाचे आमिष देऊन युवकाने लैंगिक शोषण केल्याची तक्रार पिडीत युवतीने शेगाव पोलिसांत दिली. या तक्रारीवरून शेगाव पोलिसांनी आरोपी युवकाविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पिडीत युवती आणि आरोपी दोघेही अकोल्यातील रहिवासी असल्याची माहिती शेगाव पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील एका गावातील २४ वर्षिय युवकाने गावातीलच एका वीस वर्षीय मुलीसोबत प्रेम संबंध प्रस्थापित केले. मागील दोन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. दरम्यान युवकाने मुलीस लग्नाचे आमिष देऊन शेगावातील लॉजवर नेत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे पिडितेने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच आरोपी युवकाने मोबाईलमधील युवतीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. पिडित युवतीने शेगाव शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधीत युवकाविरूद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.