‘Set’ exam on Sunday: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने महाराष्ट्र आणि गोवासाठी 39 वी सेट परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेला एकूण 1 लाख 28 हजार 243 विद्यार्थी बसणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने महाराष्ट्र आणि गोवासाठी 39 वी सेट परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेला एकूण 1 लाख 28 हजार 243 विद्यार्थी बसणार आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरात 22 परीक्षा केंद्रावर तब्बल नऊ हजार 630 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यात ही परीक्षा पार पडणार आहे. ही परीक्षा कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा घेण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर हे देखील सेट परीक्षा केंद्र असून, या केंद्रावर एकूण 9 हजार 630 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यासाठी 22 परीक्षा केंद्र असणार आहेत.
ही आहेत छत्रपती संभाजीनगरातील परीक्षा केंद्रे
शहरातील मौलाना आझाद महाविद्यालय, टॉमपॅट्रीक महाविद्यालय, डॉ. रफिक झकेरीया महाविद्यालय, सरस्वती भूवन कला महाविद्यालय, एस.बी. विज्ञान महाविद्यालय, शिवछत्रपती महाविद्यालय, व्ही.एन.पाटील विधि महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, देवगिरी महाविद्यालय, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय, मिलिंद कला महाविद्यालय, इंदिरा बाई पाठक महिला महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पीईएस पॉलटेक्निक कॉलेज, शासकीय ज्ञान- विज्ञान महाविद्यालय, एमआयटी महाविद्यालय, मिलिंद विज्ञान महाविद्यालय, तसेच वसंतराव चव्हाण नाईक महाविद्यालय अशा 22 केंद्राचा समावेश आहे.
या वेळेत पार पडणार परीक्षा
छत्रपती संभाजीनगरातील 22 परीक्षा केंद्रावर रविवारी सकाळी 10 ते 11 तेसच दुपारी 11.30 ते 1.30 या दरम्यान ही परीक्षा पार पडणार आहे. या परीक्षेची संपूर्ण तयारी पार पडली आहे.