Security forces killed 9 Naxalites : दंतेवाडा आणि बीजापूर जिल्ह्याच्या सीमेवर सुरक्षा सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चममकीत ९ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलाने दिली आहे.
दंतेवाडा(छत्तीसगड) : दंतेवाडा आणि बीजापूर जिल्ह्याच्या सीमेवर सुरक्षा सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चममकीत ९ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलाने दिली आहे.
छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा आणि बीजापूर जिल्ह्याच्या सीमेवर सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत ९ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी नक्षलवाद्यांचे मृतदेहासहित एसएलआर, ३०३ आणि १२ बोरची हत्यारे जप्त करण्यात आली आहे.
छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात मंगळवारी सुरू असलेल्या चकमकीत जिल्हा राखीव दल (डीआरजी) आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) संयुक्त पथकाने ९ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.
शोधमोहीम राबतांना उडाली चकमक
या भागात नक्षलवादी लपले असल्याची माहिती माहिती गुप्तचर यंत्रणांच्या आधारे मिळाली होती. त्यानंतर येथे शोधमोहीम राबवताना ही चकमक उडाली. नक्षलवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूकडून खूप वेळ गोळीबार सुरु होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेदहाच्या सुमारास चकमक सुरू झाली आणि अजूनही सुरू आहे.
घटनास्थळावरून शस्त्रे जप्त
आतापर्यंत नऊ माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून घटनास्थळावरून सेल्फ लोडिंग रायफल (एसएलआर), एक . ३०३ रायफल आणि ३१५ बोर रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.