Sanjay Gaikwad wins in Buldhana: ‘काटे की टक्कर’ काय ते बुलढाणा विधानसभा मतदार संघाच्या लढतीत दिसून आले. महायुती शिंदेसेनेचे संजय गायकवाड आणि महाविकास आघाडीच्या उबाठा शिवसेनेच्या जयश्री शेळके यांच्यात ही लढत झाली. सुरुवातीपासून, मताधिक्य कायम ठेवत ‘आमदार ‘ संजय गायकवाड विजयाच्या दिशेने पोहोचले. संजय गायकवाड यांचा १४७३ मतांनी विजय झाला आहे.
अभिषेक वरपे / बुलढाणा : ‘काटे की टक्कर’ काय ते बुलढाणा विधानसभा मतदार संघाच्या लढतीत दिसून आले. महायुती शिंदेसेनेचे संजय गायकवाड आणि महाविकास आघाडीच्या उबाठा शिवसेनेच्या जयश्री शेळके यांच्यात ही लढत झाली. सुरुवातीपासून, मताधिक्य कायम ठेवत ‘आमदार ‘ संजय गायकवाड विजयाच्या दिशेने पोहोचले. संजय गायकवाड यांचा १४७३ मतांनी विजय झाला आहे.
३५ वर्षाच्या संघर्षानंतर संजय गायकवाड २०१९ च्या निवडणूकीत आमदार झाले. यांनतर, राज्यात देखील सरकार असल्याने आ. गायकवाड यांना अतिशय फायदा झाला. हजारो कोटी रुपयांची विकास कामे त्यांनी मतदार संघात घडून आणली. मात्र, यंदा ही निवडणूक त्यांना सोपीही नव्हती. शिवसेना दुबंगल्यानंतर राज्यासह बुलढाण्यात ही निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची होती. लोकसभा निवडणुकीचा निसटता पराभव लक्षात घेऊन, ठाकरेंनी बुलढाणा विधानसभेसाठी महिला नेतृत्व दिले. जयश्री शेळके यांचे तगडे आव्हान गायकवाड यांच्यासमोर होते. मात्र, विकासकामे आणि वाढत्या लोकप्रियतेने गायकवाड यांनी त्यांचे आव्हान संपुष्टात आणले. पुन्हा एकदा बुलढाणा विधानसभेसाठी संजय गायकवाड हे आमदार म्हणून लाभले आहेत.
सैनिककन्येने दिले तगडे आव्हान ; पण नशिबी निसटता पराभव
निवडणूक प्रचार काळात जयश्री शेळके यांच्या प्रति देखील मतदार संघातील प्रचंड जनसमुदाय एकवटला होता. जयश्री शेळके ह्या सैनिक कन्या आहेत. सैनिक कन्याची आक्रमकता आणि निर्भिडता निवडणूक काळात दिसून आली. त्यांच्यासाठी एकसंघ महाविकास आघाडीने देखील जयश्री शेळके यांच्या प्रचारार्थ कंबर कसून काम केले. मतमोजणीत शेवटचा क्षणापर्यंत शेळके यांनी तगडी फाईट दिल्याचे दिसून आले. मात्र, त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. गेल्या पाच वर्षापासून विधानसभा निवडणूक लक्षात घेता जयश्री शेळके समाजकार्यात व राजकारणात अधिक सक्रिय झाल्याच्या दिसून आल्या.