HSC Result : बारावीचा निकाल जाहीर झाला असून, राज्यातील नऊ विभागापैकी छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल मराठवाड्यातून सर्वाधिक आहे. तर लातूर विभागाचा निकाल यंदा काहीसा घसरल्याचे चित्र आहे.
छत्रपती संभाजीनगर : बारावीचा निकाल जाहीर झाला असून, राज्यातील नऊ विभागापैकी छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल मराठवाड्यातून सर्वाधिक आहे. तर लातूर विभागाचा निकाल यंदा काहीसा घसरल्याचे चित्र आहे. बारावीच्या निकालात छत्रपती संभाजीनगर 94.08 तर लातूरचा 92.36 टक्के निकाल लागला आहे.
यंदाच्या बारावीच्या निकालात मराठवाड्यातील लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या विभागातील निकाल 90 टक्क्यांचा वर लागला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर विभागातील एकूण 94.08 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर लातूर विभागाचा 92.36 टक्के निकाल लागला आहे.
संभाजीनगरची पोर राज्यात भारी
राज्यातील नऊ मंडळापैकी छत्रपती संभाजीनगर विभागातील एका विद्यार्थिनीला शंभर टक्के गुण मिळाले आहेत. शंभर टक्के गुण मिळविणारी ही राज्यातील एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे. या विद्यार्थिनीला प्रत्यक्ष परीक्षेत 582 आणि क्रीडा गुण 18 असे एकूण 600 पैकी 600 गुण मिळाले आहेत. ही विद्यार्थिनी वाणिज्य शाखेची आहे.
असा लागला निकाल
छत्रपती संभाजीनगर- 94.08 टक्के
लातूर- 92.36 टक्के