Sahitya Akademi Award : सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

Sahitya Akademi Award

Sahitya Akademi Award : सुप्रसिध्द मराठी समिक्षक प्रा. डॉ. सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘विंदाचे गद्यरुप’ या त्यांच्या समिक्षणात्मक पुस्तकाला पुरस्कार देण्यात आल्याची घोषणा साहित्य अकादमीने केली आहे. सोबतच 21 भारतीय भाषांमधील लेखकांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

Sahitya Akademi Award

नवी दिल्ली :  सुप्रसिध्द मराठी समिक्षक प्रा. डॉ. सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘विंदाचे गद्यरुप’ या त्यांच्या समिक्षणात्मक पुस्तकाला पुरस्कार देण्यात आल्याची घोषणा साहित्य अकादमीने केली आहे. सोबतच 21 भारतीय भाषांमधील लेखकांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
रसाळ हे मराठी साहित्यसृष्टीत प्रामुख्याने समिक्षक म्हणूनच ओळखले जातात. मराठीमध्ये वाङ्मयाच्या सैद्धांतिक समीक्षेचा अभाव आहे. वाङ्मयविषयक सर्व जटिल प्रश्नांची समर्पक उत्तरे देणाऱ्या आणि वाङ्मयकृतीच्या अस्तित्वाचा आणि तिच्या सर्व घटकांच्या परस्परसंबंधाचा उचित अर्थ सांगून तिच्या मूल्यमापनासंबंधीचे योग्य निकष देणाऱ्या भूमिकेचा नव्याने शोध घ्यावा, ही प्रेरणा मराठी समीक्षेत दिसून येत नाही. दीडशे वर्षांच्या मराठी समीक्षेच्या इतिहासात असे दोनच प्रयत्न झाले.

गगन गिल यांना हिंदीतील साहित्य अकादमी पुरस्कार

साहित्य अकादमीने बुधवारी प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कार 2024 या वर्षासाठी हिंदीसाठी प्रसिद्ध कवयित्री गगन गिल आणि इंग्रजीसाठी इस्टरिन किरे यांना जाहीर केला. अकादमीचे सचिव के. श्रीनिवास राव यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, गिल यांना त्यांच्या ‘मैं जब तक आयी बहार’ या काव्यसंग्रहासाठी हा प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुढील वर्षी 8 मार्च रोजी होणाऱ्या समारंभात विजेत्या निर्मात्यांना 1 लाख रुपये, एक कोरलेली ताम्रपट आणि शाल अशा पुरस्काराने गौरविण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »