Riots in Akola: अकोल्यात दोन गटात वाद; तगडा फौजफाटा तैनात

Riots in Akola

Riots in Akola :  जुने शहरातील हरिहरपेठ परिसरात सोमवारी सायंकाळी दोन गटात दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत जमावाने एका ऑटोसह दुचाकी जाळल्याने वादाला उग्र रुप आले होते. दरम्यान पोलिसांनी दोन्ही गटातील गर्दी पांगवत परिसरात तगडा फौजफाटा तैनात केला.

Riots in Akola

अकोला : जुने शहरातील हरिहरपेठ परिसरात सोमवारी सायंकाळी दोन गटात दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत जमावाने एका ऑटोसह दुचाकी जाळल्याने वादाला उग्र रुप आले होते. दरम्यान पोलिसांनी दोन्ही गटातील गर्दी पांगवत परिसरात तगडा फौजफाटा तैनात केला. दीड-दोन तासानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

Riots in Akola
अकोल्यातील संवेदनशील परिसर असलेल्या हरिहरपेठ परिसरात सोमवारी सायंकाळी दोन गटात दगडफेक झाली. ऑटोरिक्षाला धडक लागल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, जमावाने एका ऑटोसह दुचाकी पेटविल्याने त्यामुळे जुने शहर परिसरात तणावाचे वातारवण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळावर पोहोचला. लाठीचार्ज करत पोलिसांनी दोन्ही गटातील गर्दी पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेत दोन्ही गटातील अनेक नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहेत. सध्या घटनास्थळी तणावाचे वातावरण असून, स्थानिक नागरिकांमधे भीतीचे वातावरण पसरले आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका

Riots in Akola

जूने शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »