निवासी उपजिल्हाधिकारी एसीबीच्या जाळ्यात; पाच लाखांची लाच घेतांना पकडले

छत्रपती संभाजीनगर : शेतजमिनीच्याक कामासाठी तक्रारदाराला 41 लाख रुपयांची लाच मागणी करुन 5 लाख रुपयांची लाच स्विकारतांना निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवार, 27 मे रोजी रंगेहाथ पकडले.  या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसोबत एका खासगी इसमालाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील 49 वर्षीय तक्रारदाराने त्यांच्या पार्टनरसोबत मिळून तिसगाव शिवारात 6 एकर 16 गुंठे जमीन ही वर्ग 2 ची असल्याने शासनाची परवानगी घेवून 2023 मध्ये रजिस्ट्री खरेदीखत केले आहे. सदरील जमीन ही वर्ग 2 ची असल्याने ती खरेदी करण्यासाठी शासनास लागणारे चजन जेनरेट करुन देण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी विनोद खिरोळकर व महसूल सहाय्यक दिपक त्रिभुवन यांनी 23 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी तक्रारदाराने खिरोळकर व दिपक त्रिभुवन यांना 23 लाख रुपये दिले होते. दरम्यान, सदरील जमीन वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये करण्यासाठी नजराणा शासनास पुन्हा भरावयाचा असल्याने त्यासाठी चलन जनरेट करुन देण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी खिरोळकर व महसूल सहाय्यक त्रिभुवन यांनी आणखी 18 लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच पाच लाख रुपये पहिले द्या व उर्वरित 13 लाख रुपये फाईल पूर्ण झाल्यावर द्या असे ठरले होते.

दरम्यान, तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक मुकंद आघाव, उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे, दिलीप साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गोरखनाथ गांगुर्डे, पोलिस निरीक्षक शांतीलाल चव्हाण, धस, केशव दिंडे, चैनसिंग घुशिंगे, पोलिस अंमलदार राजेंद्र सिनकर, इंगळे, अनवेज शेख, युवराज हिवाळे, घुगरे, काळे, जिवडे, कंदे, डोंगरदिवे, इंगळे, राम गोरे, बनकर, नागरगोजे आदींच्या पथकाने मंगळवारी सापळा रचून पाच लाख रुपयांची लाच स्विकारणाऱ्या उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्यासह महसूल सहाय्यक दिपक त्रिभुवन यांना अटक केली. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »