मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार 15 जानेवारी 2026 रोजी निवडणूक होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या घोषणेसह या महापालिकांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

खालील तक्त्यात पाहा निवडणुकीचा कार्यक्रम
उमेदवारी दाखल 23 ते 30 डिसेंबर
उमेदवार अर्जांची छाननी 31 डिसेंबर
उमेदवारी मागे घेण्याची मुदत 2 जानेवारी 2026
निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी 3 जानेवारी 2026
मतदान 15 जानेवारी 2026
मतमोजणी 16 जानेवारी 2026
29 महापालिकांत 2869 जागा
आयोगाच्या माहितीनुसार, मुंबईसह 29 महापालिकांतील 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यात 1442 महिला उमेदवार आहेत. त्यात अनुसूचित जातीच्या 341, एसटीच्या 77 व नागरिकांचा मागास प्रवर्गातील 759 महिला उमेदवारांचा समावेश आहे.