मुंबई : महाराष्ट्राच्या भाजपा प्रदेशाध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे आमदार रविंद्र चव्हाण यांची निवड झाली आहे. सध्या ते महाराष्ट्र भाजपचे कार्याध्यक्षपद म्हणून काम करत होते. मुंबई येथे आता प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी निरीक्षक असलेले केंद्रीयमंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत चव्हाण यांची 1 जुलै रोजी निवड करण्यात आली.

मुंबई : महाराष्ट्राच्या भाजपा प्रदेशाध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे आमदार रविंद्र चव्हाण यांची निवड झाली आहे. सध्या ते महाराष्ट्र भाजपचे कार्याध्यक्षपद म्हणून काम करत होते. मुंबई येथे आता प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी निरीक्षक असलेले केंद्रीयमंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत चव्हाण यांची 1 जुलै रोजी निवड करण्यात आली. मुंबईतील वरळी डोममध्ये हा कार्यक्रम झाला.
विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून चव्हाण यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आषिश शेलार, विनोद तावडे यासह भाजपाचे सर्व आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.