House burglary in Mahora :माहोरा येथे घरफोडीचा थरार! काळ्या पोशाखातील चोरटे ८.९० लाख घेऊन पसार

House burglary in Mahora

House burglary in Mahora : जालना जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या असून गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिल्याचे दिसत नाही. जाफ्राबाद तालुक्यातील माहोरा गावात पुन्हा एकदा चोरट्यांनी धुमाकूळ घालत मोठी घरफोडी केली. घरफोडीचा हा थरार सोमवार, 30 जून रोजी पहाटे घडला.

House burglary in Mahora

गणेश पगारे/ माहोरा : जालना जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या असून गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिल्याचे दिसत नाही. जाफ्राबाद तालुक्यातील माहोरा गावात पुन्हा एकदा चोरट्यांनी धुमाकूळ घालत मोठी घरफोडी केली. घरफोडीचा हा थरार सोमवार, 30 जून रोजी पहाटे घडला. काळ्या पोशाखात आलेल्या चोरटय़ांनी तब्बल 8 लाख 90 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गावातील रहिवासी पुखराज डिगंबर गव्हले यांच्या घरात पाच ते सहा अज्ञात चोरट्यांनी घुसून तब्बल 8 लाख 90 किमतीचा ऐवज चोरी केला.
ही घरफोडी घडली त्यावेळी पुखराज गव्हले हे घरी नव्हते. ही संधी साधत चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेतला. शेजारील घरांच्या बाहेरील कड्या लावून घेतल्यानंतर, चोरट्यांनी गव्हले यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी कपाटे आणि लोखंडी पेटी फोडून साडेआठ लाखांचे सोन्याचे दागिने ज्यात नेकलेस, गहूमणी पोत, इतर दागिने आणि ४० हजार रोख रक्कम असा एकूण 8 लाख 90 हजारांचा ऐवज लंपास केला.
या घटनेदरम्यान शेजारी राहत असलेले घनश्याम वाघ यांना रात्री संशयास्पद आवाज ऐकू आल्याने ते जागे झाले. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता काळ्या कपड्यांतील व चेहऱ्यावर रुमाल बांधलेले सहा चोरटे गव्हले यांच्या घरातून बाहेर पडताना दिसले. त्यांनी तत्काळ पुखराज गव्हले यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर गावचे सरपंच गजानन लहाने यांनी जाफ्राबाद पोलीस ठाण्याला माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक वासुदेव पवार व चालक डोईफोडे रात्रीच घटनास्थळी पोहोचले. सकाळी सहायक पोलीस निरीक्षक वैशाली पवार, कॉन्स्टेबल अरुण वाघ, विजय जाधव, जालना येथून आलेले डॉग स्क्वॉड व फिंगरप्रिंट पथक यांनी घटनास्थळी तपास सुरू केला.यावेळी स्वान पथकातील हेड कॉन्स्टेबल गणेश मिसाळ, कॉन्स्टेबल सचिन पल्लेवाड, तसेच लुशी डॉग आणि अंगठा मुद्रा (फिंगरप्रिंट) तज्ज्ञांनी पंचनामा करून तपासाची दिशा ठरवली.
या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून चोरी कुणी केली, त्यामागे कोणत्या टोळीचा हात आहे का, तसेच स्थानिक कोणी यात सामील आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे माहोरा गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांकडे लवकरात लवकर चोरट्यांचा तपास लावण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »