छत्रपती संभाजीनगर : पर्यावरणास आणि मानवी जिवीतास हानिकारक असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यासह खरेदी करणाऱ्यावर कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी शहरातील पतंग विक्रेत्यांना दिला आहे. तसेच नायलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती दिल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिस आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

मकरसंक्रांतीचा सण अवघ्या महिनाभरावर आला असून शहरात पतंगबाजीला उधाण आले आहे. कटलेल्या पतंगाच्या मांज्यामुळे दुचाकीचालकांच्य गळ्याला इजा होवून गळा कापण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शनिवार, 6 डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास वडिलांसोबत दुचाकीवर सिडकोतून सेंट्रल नाका मार्गे जात असलेल्या साडेतीन वर्षाच्या स्वरांश जाधव नावाच्या बालकाचा गळा कापल्याने त्याच्या गळ्याला जवळपास 20 ते 25 टाके पडले आहेत. या घटनेनंतर सतर्क झालेल्या वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक प्रविणा यादव यांनी रविवार, 7 डिसेंबर रोजी वेदांतनगर पेालिस ठाण्याच्या हद्दीतील पतंग विक्रेत्यांची भेट घेवून पर्यावरणास आणि मानवी जिवीतास हानीकारक असलेला नायलॉन मांजा विक्री करु नका अशा सुचना केल्या. तसेच गल्लीबोळात पतंग खेळणाऱ्या मुलांना भेटून पतंगबाजीसाठी नायलॉनचा मांजा नका असे आवाहन केले. वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांनीदेखील त्यांच्या पोलिस ठाणे हद्दीतील पंतग विक्रेत्यांची बैठक घेवून नायलॉन मांजा विक्री करु नका असे आवाहन केले. तसेच कोणी नायलॉन मांजाची विक्री करतांना आढळून आल्यास त्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.