जालना : चोर आणि पोलिसांचे फार जवळचे आणि बऱ्याचदा घनिष्ठ किंवा ‘ अर्थपूर्ण ‘ संबंध असतात, असे म्हटले जाते. पण चोरांना चोरीचे प्रशिक्षण देखील पोलिस देतात, असे म्हटले तर कदाचित कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र हे सत्य आहे. सोनसाखळी चोरांना प्रशिक्षण देणाऱ्या जालना शहारातील सदर बाजार पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद मांटे यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी गुरूवार, 17 एप्रिल रोजी सायंकाळी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

याबाबत पोलीस अधीक्षक बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना येथील सदर बाजार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मांटे यांना चोपडा ( जि. जळगाव ) पोलिसांनी बुधवार, 16 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास रंगेहात पकडले. विविध ठिकाणी 27 गुन्हे दाखल असलेल्या आणि अन्य तीन आरोपींसह चार जणांच्या टोळीला चोपडा पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार सोनसाखळी चोरांना पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद मांटे हे प्रशिक्षण देत होते. याबाबत मी जळगांव पोलिसांशी बुधवारी बोललो असून त्यांनी कायदेशीर कारवाई केली आहे. प्रशासकीय कारवाई म्हणून याप्रकरणातील प्रल्हाद मांटे यांना निलंबित करण्यात आले आहे. ते सदर बाजार पोलिस ठाण्यात कार्यरत होते. बुधवारी ते गैरहजर होते. त्यांच्या सेवानिवृत्तीला एक महिना बाकी होता.