dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जालन्यात कंत्राटदारांच्या कार्यालयावर जीएसटी पथकाची छापेमारी;  कर चुकवेगिरी करणाऱ्या कंत्राटदारांचे धाबे दणाणले 

जालना : कर चुकवेगिरी करणाऱ्या जालना शहारातील एका बांधकाम कंत्राटदाराच्या कार्यालयावर तसेच घरी वस्तू व सेवाकर विभागाच्या ( जीएसटी ) पथकाने छापेमारी सूरू केली आहे. गुरूवारी, 17 एप्रिल रोजी सायंकाळी उशिरा जीएसटी पथक जालना शहरात दाखल झाले असून एका कंत्राटदारांच्या कार्यालयावर आणि घरी या पथकाने झाडाझडती  घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

विनोद काळे / जालना : कर चुकवेगिरी करणाऱ्या जालना शहारातील एका बांधकाम कंत्राटदाराच्या कार्यालयावर तसेच घरी वस्तू व सेवाकर विभागाच्या ( जीएसटी ) पथकाने छापेमारी सूरू केली आहे. गुरूवारी, 17 एप्रिल रोजी सायंकाळी उशिरा जीएसटी पथक जालना शहरात दाखल झाले असून एका कंत्राटदारांच्या कार्यालयावर आणि घरी या पथकाने झाडाझडती  घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या कारवाईमुळे कर चुकवेगिरी करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे. 

    जालना शहरात व्यापार, उद्योग, बांधकाम व्यवसाय मोठया प्रमाणात चालतो. जालना हे व्यापाराचे मोठे केंद्र असल्यामुळे येथे जीएसटी विभाग, प्राप्तीकर विभागाकडून छापेमारी केली जाते. काही व्यापारी, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार  कर चुकवेगिरी करीत असल्यामुळे जीएसटी विभागाच्या पथकांकडून शहरात अधूनमधून छापेमारी केली जाते. दरम्यान, जालना शहरातील एका शासकीय कंत्राटदराच्या कार्यालयाची तसेच घराची झाडाझडती जीएसटी पथकाकडून घेण्यात येत आहे. जीएसटी पथक गुरुवारपासून शहरात ठाण मांडून बसले आहे. दरम्यान , या पथकाने कमालीची गोपनीयता पाळली असून आतापर्यंत या छापेमारीमध्ये नेमके काय हाती लागले आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती या पथकाकडून देण्यात आली नाही. या पथकात नेमके कोणकोणते अधिकारी – कर्मचारी सहभागी आहेत, याची देखील माहिती या पथकाकडून माध्यमांना देण्यात आलेली नाही. ज्या कंत्राटदार, बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात आणि घरी जीएसटी पथकाने छापेमारी केली आहे, तेथे नेमकेकोणकोणती कागदपत्रे तपासण्यात आली, याचीही माहिती या पथकाने अद्याप दिलेली नाही. अजून काही बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदारांच्या कार्यालयावर या पथकाकडून झाडाझडती करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top