खामगाव : पोलीस विभागाने वेगवेगळ्या कारवाई जप्त केलेला शासनाने प्रतिबंधित केलेला सुमारे 7 लाख रूपयांचा अवैध गुटखा पोलीस विभागाने न्यायालयाच्या आदेशाने 29 मार्च रोजी जाळून नष्ट केला आहे.

खामगाव : पोलीस विभागाने वेगवेगळ्या कारवाई जप्त केलेला शासनाने प्रतिबंधित केलेला सुमारे 7 लाख रूपयांचा अवैध गुटखा पोलीस विभागाने न्यायालयाच्या आदेशाने 29 मार्च रोजी जाळून नष्ट केला आहे.
मानवी आरोग्याला अपायकारक असलेला गुटख्यावर महाराष्ट्र शासनाने राज्यात बंदी घातलेली आहे. तरी चोरट्या मार्गाने गुटखा विक्री आणि वाहतुक सुरू असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून जप्त केलेल्या गुटख्याची विल्हेवाट लावण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात परवानगी मागीतली होती. त्यामुळे याप्रकरणी येथील अतिरिक्त सत्र न्यायालय खामगाव यांच्या आदेशाने 29 मार्च रोजी दुपारी 12 वाजे दरम्यान खामगाव शहर पोलिसांनी विविध गुन्ह्यात पकडलेला 7 लाखांचा गुटखा रावण टेकडी भागातील डम्पिंग ग्राउंड मध्ये जाळून नष्ट केला. यावेळी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार, पोलीस उपनिरीक्षक मोहन करुटले, पोकॉ. प्रमोद बावस्कर चालक चंदी हे उपस्थित होते.