डॉक्टरला शिवीगाळ करून रुग्णाचा हल्ल्याचा प्रयत्न; अकोला जीएमसीत धक्कादायक प्रकार उघड

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) सर्वोपचार रुग्णालयात डिस्चार्ज नंतर उपचाराच्या कागदपत्रांचा आग्रह करणाऱ्या एका रुग्णाने डॉक्टरला शिवीगाळ करून सलाईनचे स्टॅण्ड हातात घेत हल्ल्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवार, १२ रोजी सायंकाळी घडली.त्यामुळे संबंधित दोषी रुग्णांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य इंटर असोसिएशन या संघटनेच्या वतीने जीएमसी चे अधिष्ठाता यांना निवेदन देऊन करण्यात आली.

डॉक्टरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी समोर आली असून या घटनेचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.प्राप्त माहितीनुसार, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर संबंधित रुग्णाने वॉर्ड क्रमांक १२ आणि १३ मधील डॉक्टरांकडे मेडिकल डिस्चार्जची कागदपत्रे देण्यासाठी मागणी केली. मात्र रुग्णालयाच्या नियमानुसार वैद्यकीय कागदपत्रे थेट बाहेर देणे शक्य नसल्याने डॉक्टरांनी त्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या रुग्णाने आणि त्याच्या एका नातेवाईकाने डॉक्टरांच्या अंगावर धावून जात सलाईन स्टॅन्डने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी डॉक्टरांना शिवीगाळही करण्यात आली. या गंभीर प्रकारानंतर डॉक्टरांच्या संघटनेच्या वतीने अधिष्ठाता यांना निवेदन देण्यात आले यामध्ये एका रुग्णासोबत केवळ एकच नातेवाईक ठेवण्याचा नियम काटेकोरपणे लागू करावा, हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांत तक्रार दाखल करावी तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या सर्व मुद्द्यांवर शुक्रवारी तोडगा न निघाल्यास डॉक्टर आंदोलनाचा पवित्रा घेतील असा इशाराही निवासी डॉक्टरांनी दिला आहे.

सुरक्षा रक्षक असताना हल्ला होतो कसा?

सौरभच्या रुग्णालयात दाखल रुग्णाच्या प्रत्येक ग्राउंड वेळी सुरक्षारक्षकांनी डॉक्टरांसोबत जावे असे नियम आहे. मात्र डॉक्टरांच्या राऊंडच्या वेळी सुरक्षारक्षक सोबत जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे याआधी सुद्धा जीएमसीत चोरी, खून, हाणामारी व गैरप्रकार यासारख्या घटना घडल्या आहेत.गतवर्षी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी १५९ सुरक्षा रक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. 

तरी सुद्धा या प्रकारामुळे रुग्णालयात सेवा देणारे इंटर्न डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचारी सुरक्षित आहेत का? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »