P M Modi’s public meeting at Chhatrapati Sambhajinagar: महायुती सरकारने महाराष्ट्रात 70 हजार कोटींची गुंतवणूक आणली – पंतप्रधान नरेंद्र मोदी

P M Modi's public meeting at Chhatrapati Sambhajinagar

P M Modi’s public meeting at Chhatrapati Sambhajinagar : महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षाच्या काळात 70 हजार कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूकीचे करार केले असून जवळपास 45 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात आले आहेत. या प्रकल्पांमुळे आगामी काळात छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

P M Modi's public meeting at Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर :  महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षाच्या काळात 70 हजार कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूकीचे करार केले असून जवळपास 45 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात आले आहेत. या प्रकल्पांमुळे आगामी काळात छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी गुरुवारी, 14 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या एका प्रचारसभेत बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीवर जोरदार टिकास्त्र सोडले.
यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. भागवत कराड, माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, आ. अतूल सावे, अनुराधा चव्हाण, आ. प्रशांत बंब, भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर आदींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, समृध्दी महामार्गामुळे मराठवाडा, विदर्भ हे प्रदेश थेट मुंबईशी जोडले गेले आहेत. महायुती सरकार सत्तेवर येण्याअगोदर महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षाच्या काळात महाराष्ट्रातील अनेक विकासाच्या प्रकल्पांना ब्रेक लावण्याचे काम केले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. एसटी, एससी, ओबीसी आरक्षण रोखण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशिल असल्याचा आरोपही मोदी यांनी यावेळी केला. तसेच हम एक है तो सेफ है या घोषणेचा पुनरुच्चार केला. छत्रपती संभाजीनगर असे नामकरण व्हावे अशी शिवसेना प्रमूख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा भाजपने पूर्ण केली असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.
छत्रपती संभाजीनगर ही एैतिहासीक भूमी असून या भूमित अनेक साधु-संतानी जन्म घेतला आहे. काश्मीरमध्ये सत्तेत आल्यावर काँगेसने कलम 370 रद्द करण्याचा ठराव मंजूर केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच काश्मीरमधुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हटविण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करीत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. काँग्रेस सत्तेत येण्यासाठी विविध जाती जमातीमध्ये भांडणे लावण्याचे काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »