छत्रपती संभाजीनगर : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. या अतिवृष्टीत शेतीसह अनेक ठिकाणी घरादारातील सामान व वस्तु वाहून गेल्या होत्या. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवार, 20 ऑक्टोबर रोजी अतिवृष्टीग्रस्त कुटुंबियासोबत दिवाळी साजरी केली.

यवेळी शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, विधानसभा संघटक मनाजी मिसाळ, तालुका संघटक मनोज गायके, युवासेना जिल्हाधिकारी विठ्ठल डमाळे, उपजिल्हाधिकारी अक्षय साठे, किशोर हुमे, रमेश सावंत, अरुण शेलार, नंदकिशोर जाधव, बाळासाहेब बडक, माणिक निघोटे, कैलास हिवाळे, संतोष साळुंके, अमोल साळुंके, गायके, आण्णासाहेब पवार आदी उपस्थित होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अतिवृष्टीबाधित कुटुंबियांना दिवाळीसाठी किराणा किट दिल्या.