भोकरदन हादरले;  मामा व मावस भावाकडून भाच्याचा निर्घृण खून

भोकरदन : कौटुंबिक कारणामुळे सख्या मामा आणि मावस भावाने मिळून आपल्याच भाच्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली. रविवारी सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला व तपासाचे चक्र ‍फिरवून काही तासातच आरोपींच्या मुस्क्या आवळल्या. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

भोकरदन : कौटुंबिक कारणामुळे सख्या मामा आणि मावस भावाने मिळून आपल्याच भाच्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली. रविवारी सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला व तपासाचे चक्र ‍फिरवून काही तासातच आरोपींच्या मुस्क्या आवळल्या. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

परमेश्वर उर्फ दावीद सुभाष लोखंडे (26) रा.माळी गल्ली ता.भोकरदन असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत परमेश्वर लोखंडे हा काही वर्षांपासून अहिल्या नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये सासरवाडीत पत्नी व दोन लहान मुलांबाळासह राहत होता.   दिवाळी सण असल्यामुळे पत्नीला माहेरी सोडून तो भोकरदनला होता. शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास परमेश्वर हा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात असतांना, त्याचा मामा व मावस भाऊ अर्जुन त्याचा शोध घेत त्याठिकाणी आले. यावेळी दोघांनी त्याला मारहाण करून दुचाकीवर  घेऊन गेले. रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास भोकरदन पोलिसांना घटनेची माहिती मिळाली की, शहरापासून जवळ असलेल्या बरंजळा व डावरगाव फाट्याजवळ एका अज्ञात तरुणाचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह पडलेला आहे. पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंदे व फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. याचवेळी मुख्य आरोपी मावस भाऊ अर्जुन रामफळे आणि मामा अनिल कांबळे व काही नातेवाईक पोलिसांच्या पाठोपाठ घटनास्थळावर आले. पोलिसांनी नातेवाईकांना विचारपूस केली असता, उत्तर देण्यामध्ये तफावत आढळून आल्यामुळे पोलिसांनी तात्काळ सोबतच आणलेल्या गाडीची तपासणी केली असता, गाडीच्या कोपऱ्यामध्ये रक्ताचे शिंतोडे तर फॉरेन्सिक टीमच्या तपासणीत दोन आरोपीचे बोटाचे ठसे आढळून आले. पोलीसांना संशय आल्याने मामा व मावस भाऊ या दोघांना ताब्यात घेवून चौकशी केली असता, त्यांची गुन्ह्याची कबूली दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »