जालन्यात दुचाकीस्वारांकडून  नऊ तलवारी जप्त ! 

जालना  : जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वाढलेल्या आहेत. अवैध शस्त्र आणून त्याची विक्री देखील केली जात असल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत.  याशिवाय पोस्टाच्या पार्सलद्वारे धारदार शस्त्रे मागविण्यात आल्याच्या घटना देखील समोर आलेल्या आहेत. दरम्यान, मोटारसायकलवरुन नऊ धारदार तलवारीचा साठा घेऊन जात असताना पोलिसानी एकाला अटक केली आहे. ही कारवाई गुरुवार, 13 मार्च रोजी होळीच्या दिवशी चंदनझिरा पोलिसानी केली. 

चंदनझिरा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक एम. बी. स्कॉट हे होळी सणानिमित्त गस्त घालत असतांना त्यांना एक व्यक्ती शाईन मोटारसायकलवरून धारदार तलवारी घेऊन शहरातील डांगेनगरकडून नॅशनल डीएड कॉलेजकडे जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक सानप आणि स्कॉट यांनी कर्मचाऱ्यांसह नॅशनल डीएड कॉलेजच्या रोडवर आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास सापळा रचला होता. दरम्यान, सदर इसम आपल्या शाईन मोटारसायकलवरून (  एमएच-२१, बीसी-६१७८) येताच, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी या इसमाजवळ असलेल्या कापडाच्या एका गाठोडयाची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता, त्यामध्ये 67 सेंमी. लांबीच्या आणि 10 सेंमी. लांबीच्या मूठ असलेल्या तब्बल 9 टोकदार तलवारी आढळून आल्या आहेत. या व्यक्तीचे नाव खालेदबिन महंमद बासर ( रा. कुचरवटा, जुना जालना, हमू. ग्रीन पार्क कॉलनी, जालना ) असे असून त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी मोटारसायकल आणि तलवारी जप्त केल्या असून त्याच्याविरुद्ध उपनिरीक्षक सचिन सानप यांच्या फिर्यादिवरून गुन्हा दाखल केला आहे.

    पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक एम. बी. स्कॉट, पोलीस अंमलदार कृष्णा तंगे, राजू पवार, गजानन जारवाल, चालक परमेश्वर हिवाळे आदींसह कर्मचाऱ्यांनी पार पाडली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »