dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

मुंबई अमरावती एक्सप्रेसला अपघात; रेल्वे क्रॉसिंगवर ट्रकला जोरदार धडक  

मलकापूर – मुंबई कडून अमरावती येणाऱ्या मुंबई अमरावती एक्सप्रेस ला मलकापूर नाशिक बोदवड रेल्वे क्रॉसिंग जवळ अपघात झाल्याची घटना 14 मार्च रोजी पहाटे पाच वाजता दरम्यान उघडकीस आली.

मलकापूर – मुंबई कडून अमरावती येणाऱ्या मुंबई अमरावती एक्सप्रेस ला मलकापूर नाशिक बोदवड रेल्वे क्रॉसिंग जवळ अपघात झाल्याची घटना 14 मार्च रोजी पहाटे पाच वाजता दरम्यान उघडकीस आली. सदर अपघातात एकही प्रवासी जखमी झालेले नसून या अपघातामुळे रेल्वे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. 

     मुंबई- अमरावती आंबा एक्सप्रेस 14 मार्च रोजी पहाटे पाच वाजे दरम्यान मुंबई कडून अमरावती कडे प्रवाशांना घेऊन निघाली असता मलकापूर नजीक बोदवड रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावर असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर अचानक माल घेऊन जाणारा ट्रक रेल्वे रुळावर आडवा आल्याने सदर एक्सप्रेसला अपघात झाला. वर्धा रेल्वेने ट्रकला धडक दिल्याने ट्रकचे तुकडे झाले. अपघात इतका भयंकर होता की संपूर्ण ट्रक क्षतिग्रस्त झाला. अपघाताची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळतात तातडीने रेल्वे प्रशासनाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. सदर अपघातामध्ये एकही प्रवासी जखमी झालेला नसून रेल्वे इंजिनचे नुकसान झाले आहे तर मालवाहू ट्रक पूर्णपणे क्षतीग्रस्त झाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top