Mandul snake smuggling in Buldhana : जादूटोण्यासाठी मांडूळ जातीच्या सापांची तस्करी;  लोणारच्या पाच जणांना अटक

Mandul snake smuggling in Buldhana

Mandul snake smuggling in Buldhana: जादूटोणा करणाऱ्या भामट्यांसाठी लोणार येथील पाच भामट्यांनी मांडुळ जातीच्या सापाची तस्करी केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघडकीस आली आहे. पाचही आरोपी लोणारचे असून, लोणारवरून मांडूळ जातीचा ४ किलो वजनाचा साप घेऊन पाचही जण कारने छत्रपती संभाजी नगर कडे निघाले होते.

Mandul snake smuggling in Buldhana

लोणार : जादूटोणा करणाऱ्या भामट्यांसाठी लोणार येथील पाच भामट्यांनी मांडुळ जातीच्या सापाची तस्करी केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघडकीस आली आहे. पाचही आरोपी लोणारचे असून, लोणारवरून मांडूळ जातीचा ४ किलो वजनाचा साप घेऊन पाचही जण कारने छत्रपती संभाजी नगर कडे निघाले होते. चिकलठाणा विमानतळा समोर पोलिसांनी कारला अडविले तेव्हा हा प्रकार समोर आला.
रामभाऊ नारायण अंभोरे (४२वर्ष), संतोष बाबुराव कोकाटे(२१वर्ष), राजू विठ्ठल इंगोले (४०वर्ष) रवींद्र बाबाराव कलसारे (२६वर्ष) कन्हैयालाल बद्रीलाल जानवा (२४वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये मांडुळ जातीचा साप घेऊन छत्रपती संभाजीनगर कडे जात होते. गोपनीय सूत्रांनी तशी माहिती दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी चिकलठाणा विमानतळा जवळ सापळा रचला. मात्र पोलीस दिसतात आरोपींनी गाडी सुसाट वेगाने चालवली. पोलिसांनी पाठलाग करून गाडी अडवली, तपासणीनंतर गाडीत एका पिशवीत मातीत ठेवलेला ४ किलो वजनाचा मांडुळ जातीचा साप आढळून आला. पोलिसांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून साप वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला.

आरोपींच्या चौकशीत सदर साप काळ्या जादू करणाऱ्यांना विकण्यासाठी घेऊन जात असल्याचे समोर आले. आरोपींचे मोबाईल जप्त केले असता त्यात विविध मांडूळ जातीच्या सापांचे फोटो दिसले. काही फोटो काळी जादू करणाऱ्यांच्या व्हाट्सअप ग्रुप वर पाठवले असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे सापाची तस्करी करणारी ही टोळी अनेक दिवसांपासून असले उद्योग करीत असावे असा संशय पोलिसांना आहे. लोणार मध्ये वनसंपदा आणि जैवविविधता मोठ्या प्रमाणात आहे. लोणार वन्यजीव अभयारण्यातूनच आरोपी सापांची तस्करी करीत असावेत असा संशय पोलिसांना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »