Fire in a corn heap in Buldhana: जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील जागदरी येथील शेतकऱ्याच्या शेतातील सोंगलेल्या शाळू पिकाची कणसे अज्ञात समाजकंटकाने जाळून टाकल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक व पारिश्रमिक नुकसान झाले असून शिवारातील ही तिसरी घटना असल्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिंदखेडराजा : तालुक्यातील जागदरी येथील शेतकऱ्याच्या शेतातील सोंगलेल्या शाळू पिकाची कणसे अज्ञात समाजकंटकाने जाळून टाकल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक व पारिश्रमिक नुकसान झाले असून शिवारातील ही तिसरी घटना असल्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जागदरी येथील रमेश गंगाराम सानप (५० वर्षे) हे अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांनी काबाडकष्ट करीत आपल्या गट क्र. ३० मधील शेतात रब्बी हंगामात शाळू ह्या पिकाची पेरणी, संगोपन व रक्षण केले होते. एका दिवसापूर्वी शाळू सोंगणी करीत शेतात कणसे बैलगाडीत व बाजूला रचली होती. त्याचा ढीग अज्ञात समाज कंटकाने रात्रीच पेटवून दिल्याने रमेश सानप यांच्या तोंडचा घास हिरवल्याचा प्रकार घडला आहे. कणसांच्या ह्या राशीतून अंदाजे १० क्विंटल उत्पादन झाले असते, असे शेतकऱ्यांचा अंदाज आहे.
जागदरी येथील शिवारात सोंगणी केलेल्या पिकांचे ढीग पेटवून देण्याची गत सहा महिन्यातील ही तिसरी घटना आहे. लागोपाठ होणाऱ्या ह्या घटनांमागील कारणाचा शोध घेऊन पोलीस यंत्रणेने समाज कंटक आरोपींना धडा शिकवावा तसेच त्यांच्या पाठीशी असणाऱ्यांना लगाम घालावा अशी मागणी व्यक्त होत आहे.