छत्रपती संभाजीनगर : नैसर्गिक आपत्तीमुळे मागील 4 महिन्यात राज्यातील 1 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून 533 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आंबादास दानवे यांनी केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : नैसर्गिक आपत्तीमुळे मागील 4 महिन्यात राज्यातील 1 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून 533 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आंबादास दानवे यांनी केली आहे.
मागील पंधरा दिवसापासून मराठवाड्यात पावसाचा कर पहायला मिळत आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे जवळपास 30 शेकऱ्यांसह कामगारांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय वादळीवाऱ्यासह पडलेल्या विजांमुळे शेकडो जनावरे दगावली आहेत. या पार्श्वभूमिवर माहिती देतांना विरोधी पक्षनेते दानवे म्हणाले, मार्च 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत झालेल्या विविध नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एकूण 13 हजार 819 कोटी रुपये अद्याप वाटप होणे बाकी आहे. पीक कापणी प्रयोगावर आधारित या एकाच निकषावर सरकार पीक विम्याची एकदाच भरपाई देणार आहे, हे अन्यायकारक असून याविरोधात आपण आवाज उचलणार असल्याची घोषणा त्यांनी केली. राज्यातील विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती कोसळली असताना सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला.
बीडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यावरही परळीमध्ये शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे तेथील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न गंभीर झाला आहे. या वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या विरोधातही आपण लोकांमध्ये जावून सरकारचा अपयशीपणा सांगणार असल्याचे ते म्हणाले.
राज्यात गुत्तेदारांच साम्राज्य
जनतेचा विरोध असताना ही विविध विकासकामांच्या नावाखाली सामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहण करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असून गुत्तेदारांच साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला.
चुकीला माफी नाही
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या राजशिष्टाचारात निष्काळजीपणा केला व त्यांनी नाराजी व्यक्त केल्यावर सरकारने पत्रक काढलं. या चुकीवर पांघरूण घालून चालणार नाही,चुकीला माफी नाही असे म्हणत विरोधी पक्ष म्हणून आम्ही याविरोधात भूमिका घेऊ असे दानवे म्हणाले.