dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

रस्ता ओलांडताना टिप्परने उडविले; साखरखेर्डा येथील इसम ठार..  

सिंदखेडराजा : लग्नासाठी गेलेल्या ४२ वर्षीय इसमाला मंगल कार्यालयासमोर रस्ता ओलांडताना भरधाव टिप्परने उडविले. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. हा भीषण अपघात देऊळगावराजा येथे बुधवारी दुपारी घडला. 

सिंदखेडराजा : लग्नासाठी गेलेल्या ४२ वर्षीय इसमाला मंगल कार्यालयासमोर रस्ता ओलांडताना भरधाव टिप्परने उडविले. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. हा भीषण अपघात देऊळगावराजा येथे बुधवारी दुपारी घडला. 

राहुल यशवंता गव‌ई (४२ वर्षे) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गवई हे गावात पेपर वाटण्याचे काम करायचे.  एका विवाह सोहळ्यासाठी ते देऊळगावराजा येथील चिखली मार्गावरील पंकज लॉन्ससमोर पोहोचले होते. दरम्यान, साखरखेर्डा येथून आलेले  वऱ्हाडी उभे असलेल्या मार्गावर ते उभे राहिले. तेथून रस्ता ओलांडत लग्न मंडपाकडे जात असतांनाच त्यांना  भरधाव टिप्परने चिरडले, यात त्यांचा मृत्यू झाला.  ही घटना कळताच लग्न मंडपात एकच खळबळ उडाली होती. सगळीकडे शोककळा पसरली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top