dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

घरगुती वादातून वृद्धावर कुऱ्हाडीने हल्ला!; चार जणांविरोधात गुन्हा दाखल 

देऊळगाव राजा : घरगुती  वादातून एका ८० वर्षीय वृद्धावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शहरातील संजयनगर भागात  सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी  चार जणांविरोधात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. 

   घरगुती वादातून हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.  हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्धानेच  याप्रकरणाची तक्रार दिली आहे. मुंगनाथ भिमा शिंदे असे त्यांचे नाव असून 21 मे रोजी सकाळी 11 वाजता संजय नगर येथे हजर असताना त्यांचा नातेवाईक असलेला भावेश विजय शिंदे याने  त्यांच्या डोक्यावर व हातावर कु-हाडीने  वार करुन गंभीर जखमी केले. तर, विजय मुंगनाथ शिंदे, रंजूबाई विजु शिंदे, आकेश विजय शिंदे (सर्व रा. संजय नगर) यांनी मिळून चापटा-बुक्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून उपरोक्त आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  पोलीस उपनिरीक्षक  कांचन जारवाल  यांच्याकडे पुढील तपासासाठी प्रकरण  सुपूर्द करण्यात आले आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top