बुलढाणा : गतवर्षी मोठ्या प्रमाणात रोहिणग्यांनी खोटे कागदपत्र दाखल करून जन्मप्रमाणपत्र मिळवले होते. बुलढाणा जिल्ह्यात नायब तहसीलदाराने ३०० हून अधिक बेकायदेशीर प्रमाणपत्राचे आदेश दिले. ते सर्व आदेश रद्द करण्याचे निर्देश मंत्रालयाने दिले असताना आजपर्यंत एकही प्रमाणपत्र परत घेण्यात आले नाही, अशी माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिली. २६ जून रोजी ते बुलढाणा दौऱ्यावर आले असताना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची त्यांनी भेट घेतली.

यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. बेकायदेशीर प्रमाणपत्रातील सर्व नावे रद्द करण्याची कारवाई सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. याव्यतिरीक्त काही ठिकाणी सरकारी दवाखान्यात एका वर्षाहून अधिक लोकांचे नाव बेकायदेशीरित्या जन्म नोंद करण्यात आल्या असून, मलकापूर येथे तब्बल १४२६ बेकायदेशीर नोंदी करण्यात आल्या असल्याचे सोमय्या म्हणाले. याप्रकरणी सातत्याने पाठपुरावा करणार असून, सर्व बेकायदेशीर प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई प्रशासकीय पातळीवर सुरू होणार आहे, असेही ते म्हणाले.