World Water Day : जल हेच जीवन;आज जागतिक जल दिन

World Water Day

World Water Day :  २२ मार्च हा दिवस “जागतिक जल दिन” म्हणुन साजरा केला जातो. मुळातच कोणताही दिवस साजरा का केला जातो बर? माणसाच्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस सारखाच असतो पण एखाद्या दिवसाचे विशेष महत्व असते. ज्या गोष्टी मानवी जिवनात अमुल्य आहेत व ज्या गोष्टींचे मुळातच नैसर्गीक साठे कमी आहेत, अशा गोष्टी निसर्गाच्या समतोल राखण्यासाठी सांभाळूण वापरणे किेंवा त्यांचे संवर्धन करणे गरजेचे झाले आहे.

World Water Day

World Water Day :  २२ मार्च हा दिवस “जागतिक जल दिन” म्हणुन साजरा केला जातो. मुळातच कोणताही दिवस साजरा का केला जातो बर? माणसाच्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस सारखाच असतो पण एखाद्या दिवसाचे विशेष महत्व असते. ज्या गोष्टी मानवी जिवनात अमुल्य आहेत व ज्या गोष्टींचे मुळातच नैसर्गीक साठे कमी आहेत, अशा गोष्टी निसर्गाच्या समतोल राखण्यासाठी सांभाळूण वापरणे किेंवा त्यांचे संवर्धन करणे गरजेचे झाले आहे. त्यामधील पृथ्वीवरील अत्यंत मौल्यवान संपत्ती ही जलसंपत्ती आहे. त्यातही पिण्यायोग्य पाणी हे अत्यंत दुर्मिळ घटकामध्ये मोजले जाण्याची वेळ आता आली आहे. भुतलावावरील उपलब्ध पाण्यापैकी केवळ 3 टक्के पाणी हे पिण्यायोग्य आहे, याबाबत आपण सर्वच ज्ञात आहोत. पण या 3 टक्के पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पुढच्या पिढीला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये, म्हणुन पाण्याच्या नैसर्गीक साठ्यांचे जतन करणे आज रोजी काळाची गरज बनली आहे.

ब्राझील मधील रिओ दि जानेरो येथे संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेने जागतिक जल दिन साजरा करण्याचा 1992 मध्ये निर्णय घेतला व त्यानुसार 22 मार्च 1993 पासुन “जागतिक जल दिन” साजरा केला जात आहे. पाणी म्हणजे जीवन….! जीवन जगण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे. आजरोजी बदलत्या हवामानामुळे जलसंवर्धनाची गरज वाढली आहे. जलसंवर्धन करणे हे कोणा एकट्याचे काम नसून त्याबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढली पाहिजे. त्यासाठी 22 मार्च हा “दिवस जल दिन” म्हणुन साजरा केला जातो. भारतामध्ये 5 हजार 334 धरणे बांधली आहेत त्यापैकी 447 धरणे ही मोठी धरणे मोजली जातात. धरणात साठणारे हे पाणी औद्योगीकरण, शेती, वीजनिर्मीती व सर्वात महत्वाचे पिण्यासाठी वारले जाते. धरणातील पाणी त्यावर आवश्यक त्या प्रक्रीया करुन आपणास पिण्यायोग्य बनवले जाते तरीही जगामध्ये बरेच देश पाणी टंचाईस सामोरे जात आहेत. आजही बऱ्याच ठिकणी टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येत आहे. जागतिक जलदिनानिमीत्त पाण्याचे महत्व आपण समजून घेतले नाही, तर भविष्यात तिसरे महायुध्द हे पिण्याच्या पाण्‍यासाठी होईल, असे म्हटले जाते.

पश्चिम महाराष्ट्रातून विदर्भात बुलढाणा येथे नोकरी निमित्त राहायला आल्यावर समजले की, या भागात पाणी दर आठ दिवसांनी येते, माझ्या आयुष्यातील खरी जलजागृतीची सुरवात तेंव्हा पासुनच सुरु झाली. पुणे-मुंबई अशा मोठया शहरामंध्ये नळाला 24 तास पाणी सुरु असते, परंतु ज्यावेळी “वरुण देव” अपेक्षेप्रमाणे येत नाहीत, त्यावेळी मोठया शहरांना देखील पाणी टंचाईस सामोरे जावे लागते. पण यामुळे शहरी भागात लोकांमध्ये पाणी काटकसरीने वापरण्याचा अभावच दिसून येतो.

तसे पाहिले तर पाण्याचे महत्व समजून पाण्याचे संवर्धन व पाणी काटकसरीने वापर करणेबाबत समाजातील सर्व स्तरांवर प्रबोधन होणे अपेक्षित आहे पण, मानवी स्वभावाचा अभ्यास करता आपल्याकडे उपलब्ध असलेल्या गोंष्टीची किंमत सहसा कोणी करताना दिसून येत नाही. आज आपल्या आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध आहे, पण हवामानाच्या बदलत्या स्वरुपाचा विचार करता भविष्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यास आपणास पाण्याअभावी असंख्य अडचणीस तोंड द्यावे लागेल.

आपल्या शरीरात सुमारे 70 टक्के पाणी आहे. शरीराचे तापमान नियंत्रीत करण्यासाठी तसेच शरीरातील सर्व क्रिया सुरळीत चालण्यासाठी दिवसभरात किमान 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. आज आपण पाण्याचे जतन केले नाही, तर भविष्यात निश्चितच पाण्याचा तुटवडा निर्माण होउ शकतो. अशी वेळ आपणा सर्वांवर येवू नये, म्हणून महाराष्ट्र शासनाने देखील 22 मार्च जागतिक जलदिनाचे औचित्य साधून 16 ते 22 मार्च हा सप्ताह “जलजागृती सप्ताह” म्हणून राबविण्यात यावा याबाबत सर्वांनाच अवाहन केले आहे. चला तर मग पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सुरवात आपल्यापासुनच करुयात.

1. घरी आलेल्या पाहुण्यांना आवश्यकता नसताना एक भरलेला ग्लास पाणी देउन राहीलेल पाणी फेकुन देण्यापेक्षा पाणी देतानांच अर्धा ग्लास भरुन द्या.

2. बाथरुमध्ये आवश्यकता नसतांना नळ सुरु राहणार नाही, याची दक्षता घ्या

3. सार्वजनिक ठिकाणी नळाची तोटी सुरु राहिली असल्यास एक जबाबदार नागरिक म्हणून तो नळ बंद करा.

4. घरामध्ये पाश्च्यात्य पध्दतीच्या शौचालयामध्ये आवयकतेनुसारच फ्लशचा वापर करा.

5. घरामध्ये आवश्यकता असेल तरच शॉवरचा वापर करावा, अथवा अंघोळीस बादली व मग वापरुयात.

6. स्वयंपाकावेळी भाज्या धुताना किंवा भांडे धुताना गरजेपुरताच नळ सुरु ठेवा.

7. पाणी वापरादम्यान पाण्याचे वॉटर मिटर बसवून घ्यावे.

8. पावसाच्या पाण्याचे रेन वॉटर हार्वेस्टींगकरुन घरामध्ये वापरावे.

9. घराभोवती शक्य तीथे झाडे लावा व त्यांचे जतन करा.

10. शेतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर करा.

World Water Day

आजच्या या जलदिनानिमीत्त छोट्या-छोट्या बाबी सर्वांनी मनावर घेतल्या तर एकत्रित पणे मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणणाऱ्या सवयी बाळगूयात व पाण्याचे जतन करुन नैसर्गिक पाणी साठा वाढण्यासाठी हातभार लावूया..!

-क्षितीजा श्रीधर गायकवाड
उपकार्यकारी अभियंता
बुलढाणा पाटबंधारे विभाग, बुलढाणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »