आमदार विलास भुमरेंकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपद; तीन तालुक्यांच्या कारभाराची असेल जबाबदारी

छत्रपती संभाजीनगर :  शिवसेनेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्याकडे जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये पैठण, सिल्लोड, फुलंब्री या तीन तालुक्यांची जबाबदारी भुमरे यांच्याकडे देण्यात आली आहे. ही नियुक्ती एक वर्षासाठी करण्यात आली आहे. यापूर्वी हे पद रमेश पवार यांच्याकडे होते. पवार यांनी फुलंब्रीमधून अपक्ष निवडणूक लढवली होती.

एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद, मनपा आणि नगरपालिका निवडणुकासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या नियुक्त्या करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पक्षात प्रवेश घेतलेल्या पदाधिकाऱ्यांना कधी जबाबदारी मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे.

पक्षाची ताकद वाढवणार 

याबाबत विलास भुमरे म्हणाले की, आगामी काळात निवडणुका असल्यामुळे माझ्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे या तिन्ही तालुक्यांत जास्तीत जास्त जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या जागा निवडून आणण्याचे माझे ध्येय आहे. तसेच संघटना आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने आणखी ताकद या भागात वाढवण्यात येईल. कार्यकर्त्यांना बळ देण्यात येणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »