बुलढाणा : रहात्या घराला आग लागून संसारोपयोगी साहित्यासह सुमारे 3 लाख रूपयांचे नुकसान झाल्याची घटना 20 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजे दरम्यान बुलढाणा तालुक्यातील दहिद बु. येथे घडली.

बुलढाणा : रहात्या घराला आग लागून संसारोपयोगी साहित्यासह सुमारे 3 लाख रूपयांचे नुकसान झाल्याची घटना 20 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजे दरम्यान बुलढाणा तालुक्यातील दहिद बु. येथे घडली.
दहिद बु येथील संजय नथ्थुसिंग राजपूत यांच्या राहत्या घराला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण घर आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या आगीत घरातील फ्रिज, टीव्ही, कूलर, गॅस रेग्युलेटर, सागवानी पलंग व सोफा, टिनपत्रे, रोख रक्कम १००००० रुपये, दोन तोळे सोने आणि चांदीचे दागिने हे सर्व साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले. याशिवाय डाळी, तेल, किराणा, भांडी यांसह स्वयंपाकाचे सर्व साहित्यही जळून गेले.
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र सदर कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी याबाबत पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला असून पुढील मदतीसाठी अहवाल संबंधित विभागाला सादर केला जाणार आहे. संकटग्रस्त कुटुंब उघड्यावर आले असून संसाराची राखरांगोळी झाली आहे,त्यामुळे या कुटूंबाला शासनाने तात्काळ मदत देण्याची मागणी होत आहे.