Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील राज्याच्या दौऱ्यावर असतानाच दौरा अर्धवट सोडून छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.
छत्रपती संभीजनगर : मनोज जरांगे पाटील राज्याच्या दौऱ्यावर असतानाच दौरा अर्धवट सोडून छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. अशक्तपणा जाणवत असल्याने जरांगे पाटील रुग्णालयामध्ये दाखल झाल्याची माहिती आहे
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती शुक्रवार 17 मे रोजी बिघडली असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुसरीकडे, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी, मराठा आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी मंगळवारी आपण त्यासाठी पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. ४ जूनपासून जालन्यात आमरण उपोषणाला बसणार असून, 8 मे रोजी शेजारील बीड जिल्ह्यातही मोठा मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.