dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

प्रतिबंधीत गुटख्याचा साठा करुन विक्री करणारा गजाआड; कारसह 16 लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर :  महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याचा साठा करुन विक्री करणाऱ्यास गुन्हेशाखा पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले. ही कारवाई सोमवार, 27 एप्रिल रोजी रात्री उशिरा हर्सूल परिसरातील अंबरहिल परिसरात करण्यात आली. 

छत्रपती संभाजीनगर :  महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याचा साठा करुन विक्री करणाऱ्यास गुन्हेशाखा पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले. ही कारवाई सोमवार, 27 एप्रिल रोजी रात्री उशिरा हर्सूल परिसरातील अंबरहिल परिसरात करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी 4 लाख 15 हजार रुपये किंमतीचा गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा आणि एक कार असा एकूण 16 लाख 15 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती गुन्हेशाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी मंगळवार, 28 एप्रिल रोजी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश हरिभाऊ जगताप (29 वर्ष), रा. अंबरहिल, जटवाडा रोड, हर्सूल परिसर असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचे नाव आहे. अंबरहिल परिसरातील नितेश जगताप हा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा करुन विक्री करत असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक राजपूत, पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्नसुरक्षा अधिकारी किर्तीका झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अर्जुन कदम, पोलिस अंमलदार योगेश गुप्ता, श्रीकांत काळे, राजेंद्र साळुंके, सतीश हंबर्डे, मनोहर गीते, विक्रम खंडागळे, महिला पोलिस अंमलदार वैष्णवी जटाळे, माया माळी आदींच्या पथकाने सोमवारी रात्री नितेश जगताप यांच्या घरावर छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी नितेश जगताप यांच्या घरातून 4 लाख 15 हजार रुपये किंमतीचा गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा आणि एक कार असा एकूण 16 लाख 15 हजार रुपये किंमतीाच मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नितेश जगताप याच्याविरुध्द हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top