जालना : चाळीशी पार गेलेल्या तापमानामुळे उकाडा वाढला आहे. या उकाडय़ामुळे जालना शहरातील नागरिक त्रस्त झालेले असतानाच शुक्रवार, 11 एप्रिल रोजी पहाटे सहावाजेपासून जुना जालना भागातील वीज पुरवठा खंडित झालेला होता. सात तासांपासून वीज गायब असल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.

जालना शहरातील वीज पुरवठा नेहमीच खंडित होत राहतो. दिवसभरातून कितीतरी वेळा वीज गायब होते. याबाबत नागरिकांकडून वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांना विचारणा केल्यावर ओव्हर लोडमुळे वीज खंडित होते, विद्युत वाहिनी जुनी झाली,
तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित होतो, अशी काही कारणे सांगितले जातात. वीज वितरण कंपनीने शहरातील वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, उन्हाळ्यामुळे विजेचा वापर देखील वाढल्यामुळे फिडरवर लोड येऊन वीज पुरवठा खंडित होत असल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
33 केव्हीमध्ये बिघाड : अधिकार
सकाळी 33 केव्हीच्या विद्युत खांबावर बिघाड झाल्यामुळे जुना जालना भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. हा बिघाड दुरुस्त करण्यात आल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला, अशी प्रतिक्रिया वीज वितरण कंपनीचे शहर विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष अधिकार यांनी दिली.