बुलढाणा : शहराची पहिली वस्ती असलेल्या म्हाडा कॉलनी परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार पाहायला मिळाला. शुक्रवारी सकाळी ६ वाजता स्थानिक नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले.
बुलढाणा : शहराची पहिली वस्ती असलेल्या म्हाडा कॉलनी परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार पाहायला मिळाला. शुक्रवारी सकाळी ६ वाजता स्थानिक नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले.
वन्य प्राण्यांच्या दहशतीच्या घटना हल्ली नवीन नाही. दिवसेंदिवस हिंस्त्र वन्य प्राण्याचे शहरी भागात होणारा दर्शन वाढले आहे. बुलढाणा शहरालगत असलेल्या राजुर घाट अनेक वन्य प्राण्यांच्या घटनांनी परिचित आहे. दरम्यान, आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातली पहिली वस्ती ठरलेल्या म्हाडा कॉलनी भागात स्थानिक नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. शरद गावंडे हे सकाळी कामानिमित्त आपल्या घराबाहेर पडले असता राष्ट्रवादी भवन समोर आले. त्यानंतर थोडे, फिरायचे म्हणून, म्हाडा कॉलनी भागाकडे ते वळाले होते. त्या ठिकाणी अनेक नागरिक सकाळी शारीरिक हालचाली करून, थंडीत आरोग्य जपण्यासाठी फिरत असतात. सर्वप्रथम गावंडे यांनी भिंतीच्या आडोशाला लागून असलेल्या बिबट्याला बघितले. त्यानंतर, त्यांनी सर्वांना ही बाब सांगितली. अनेक जणांनी बिबट्याला बघितल्याचे गावंडे सांगतात. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.