मलकापूर : बुलढाणा जिल्ह्यात एका मजुराला सतीश भोसले उर्फ खोक्याने बॅटेने बेदम मारहाण केल्याचे प्रकरण संपर्णू महाराष्ट्रात गाजले होते. सदर प्रकरण ताजे असतांना आता बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे सुध्दा असाच एक प्रकार समोर आला आहे. उसने पैसे परत न केल्याच्या कारणावरून दोघांनी 35 वर्षीय इसमाला भंगाराच्या गोदामात खुर्चीला बांधून अमानूष मारहाण करून त्याचा मारहाणीचा व्हिडीओ काढून व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मलकापूर पोलिसांनी पिडीत इसमाच्या तक्रारीवरून दोघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शे.जाकीर शे.जाबीर या तरुणाने सै. अफरोज सै. हसन कुरेशी व जावेद शहा शफि शहा यांचेकडून उसने पैसे घेतले होते. परंतु त्याच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे सदर उसने घेतलेले पैसे तो वेळेवर परत करू शकला नाही. म्हणून त्याला हामशी नगर मधील भंगाराच्या गोदामात बोलून सै. अफरोज सै. हसन कुरेशी, जावेद शहा शफि शहा या दोघांनी शे. जाकीर शे.जाबीर याला खुर्चीला बांधले तसेच व्हिडिओ चित्रीकरण केले त्यानंतर खुर्चीसह खाली पाडून शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी सोडून देण्याची विनंती तरुणांकडून करण्यात आली. पंधरा दिवसाची मुदत देतो जर पैसे न दिल्यास ठार मारू अशी धमकी तरुणाला देण्यात आली. अशा फिर्यादीवरून मलकापूर पोलिसात दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर वर्गे हे करीत आहेत.