बुलढाणा : भारतीय हवाई दलाने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मुळे देशाची ताकद सिद्ध झाली असून, सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्याच्या दृष्टीने राज्यभरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार, २० मे रोजी बुलढाणा शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली.

भाजप नेते विजयराज शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरून निघालेली तिरंगा रॅली पुढे, संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार गल्ली, कारंजा चौक, चिखली रोड, सर्क्युलर रोड मार्गे शहीद जवान स्मारकावर पोहोचली. या ठिकाणी शहिदांना अभिवादन करण्यात आले. भारतीय सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी व त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे विजयराज शिंदे यांनी सांगितले. याप्रसंगी, कर्नल सुहास जतकर यांनी देखील आपले मत मांडले,पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सेनेने केलेली कारवाई जिव्हारी लागल्याने पाकिस्तानने भारताविरुद्ध हवाई हल्ले करण्याचे प्रयत्न केले होते. परंतु, भारताने हवेतच सर्व हल्ले हाणून पाडले व चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय हवाई दल तसेच संपूर्ण सैनिकांचा अभिमान असल्याचे प्रतिपादन जतकर यांनी केले.