Businessman robbed in Washim: हिंगोली रोडवरील विठ्ठल खाजगी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून त्याच्या जवळचे 1 कोटी 15 लाख लुटले. या घटनेची माहिती मिळताच वाशीम पोलीस घटनास्थळी पोहचले.
गजानन देशमुख / वाशीम : हिंगोली रोडवरील विठ्ठल खाजगी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून त्याच्या जवळचे 1 कोटी 15 लाख लुटले. या घटनेची माहिती मिळताच वाशीम पोलीस घटनास्थळी पोहचले.
सविस्तर असे की, वाशीम शहरालगत बाहेती परिवाराची खाजगी कृषी बाजार समिती असून तेथे शेतकऱ्याचा माल खरेदी केल्या जातो. याठिकाणी लाखो रुपयांची उलाढाल होत असते. खरेदी केलेल्या मालाचे पैसे देण्यासाठी बँकेतून बाहेती यांचे अत्यंत विश्वासू कर्मचारी ज्ञानेश्वर बयस आणि विठ्ठल हजारे हे नेहमी प्रमाणे सायंकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी रेल्वे पुलावरून जात असताना अज्ञात दोघांनी मागे बसलेल्या विठ्ठल हजारे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड ने मारहाण केली. त्यांना गाडीच्या खाली पाडून ज्ञानेश्वर यांच्यावर चाकूचे वार करत त्यांच्या जवळची असलेली पैशाची बॅग हिसकावून पळ काढला. विठ्ठल हजारे आणि ज्ञानेश्वर बयस यांना देवळे हॉस्पिटल येथे उपचारर्थ दाखल करण्यात आले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सूरू असून पोलीस आरोपीच्या शोध घेत आहेत.