खामगाव क्राईम : लग्नास नकार दिल्याने प्रियसीची चाकूने भोसकून हत्या करून प्रियकराची आत्महत्या!

खामगाव :  मेहकर तालुक्यातील साखरखेर्डा येथील प्रेमी युगोलाच्या प्रेम प्रकरणाचा खामगावात अंत झाला असून लग्नास नकार देणाऱ्या 25 वर्षीय घटस्फोटीत प्रियसीचा चाकूने भोसकून खून करून प्रियकराने स्वतःवरही चाकूचे वार करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना खामगाव शहराजवळील बुलढाणा मार्गावरील जुगनू हॉटेलवर उघडकीस आली आहे. 

        पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साखरखेर्डा येथील सोनू उर्फ साहिल दीपकसिंग राजपूत आणि पायल समाधान पवार या दोघांचे मागील दोन वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू होते. साहिल हा पायलला नेहमीच लग्नासाठी गळ घालत होता. दरम्यान दोघेही 23 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता दरम्यान खामगाव शहरालगत असलेल्या बुलढाणा मार्गावरील हॉटेल जुगनू येथील गेस्ट हाऊस वर थांबले होते. यादरम्यान या दोघांमध्ये पुन्हा लग्नावरून वाद उफाळून आला या वादातून साहिल याने पायलला धारदार चाकूने भोसकून तिची हत्या केली. त्यानंतर स्वतःवर सुद्धा चाकूचे घाव घालून आत्महत्या केली. सदर घटना काही वेळातच हॉटेल चालकाच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने शिवाजीनगर पोलीस स्टेशनला माहिती दिली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व हॉटेलमध्ये पाहणी केली असता दोघेही रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले व घटनेची चौकशी केली. यावेळी पोलीस विभागाकडून फॉरेन्सिक लॅबच्या तज्ञांना सुद्धा पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी दोघांचे मृतदेह सामान्य रुग्णालय येथे पाठविले असून पोलिसांची कारवाई सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »