आंतरराज्य वराह चोर टोळीचा पर्दाफाश | पोलिसांकडून थरारक पाठलाग ; ६ आरोपी गजाआड

भोकरदन : शहरात पाळीव वराह (डुक्कर) चोरी करणाऱ्या एका सराईत आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी या टोळीतील ६ आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीसाठी वापरण्यात येणारे वाहन आणि घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

भोकरदन : शहरात पाळीव वराह (डुक्कर) चोरी करणाऱ्या एका सराईत आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी या टोळीतील ६ आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीसाठी वापरण्यात येणारे वाहन आणि घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

याबाबद पोलिसांनी सांगितले की, शहरातून वराह चोरी झाल्याबाबत १४ जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत आणि त्यांच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली होती. बुधवार, २१ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास जाफ्राबाद रोडने एक संशयास्पद पिकअप (एमएच ३७ टी ३५२०) जात असल्याची माहिती या पथकाला मिळाली. पोलिसांनी या पिकअपचा पाठलाग सुरू केला. संशयितांनी वाहन वेगाने माहोटा रोडकडे नेले. मात्र, पोलिसांनी माहोटा येथील चौकात ट्रॅक्टर आडवे लावून रस्ता अडवला. चालकाने तिथून वाहन वळवून विरेगावच्या दिशेने पळ काढला, पण तिथेही पोलिसांनी मोठ्या शिताफीने पिकअप अडवली. अंधाराचा फायदा घेऊन आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी नरेंद्रसिंग लोंढा, रा. अहमदाबाद, गुजरात याला ताब्यात घेतले. या झटापटीत पोलीस अंमलदार लक्ष्मण राणगोते हे जखमी झाले.

बसमधून पळ काढण्याचा प्रयत्न फसला

चार आरोपी कुंभारी पाटीवरून जालनाकडे निघलेल्या एसटी बसमध्ये बसल्याचे समजले. पोलिसांनी तत्काळ केदारखेडा येथे बस थांबवून तपासणी केली असता, बसमधील अनिलसिंग अंद्रेले आणि गोलूसिंग अंद्रेले यांना ताब्यात घेतले. याचवेळी खिडकीतून उडी मारून शेतात पळणाऱ्या अशोक बोकडे आणि विजय जाधव दोघेही रा. गुजरात यांनाही पोलिसांनी पाठलाग करून मक्याच्या शेतातून पकडले. तसेच, छत्रपी संभाजीनगर येथे लावलेल्या सापळ्यात या टोळीचा आणखी एक सदस्य किरण बाबू बोकडे रा. गुजरात आणि महादु वसंत कवाडे रा. कारंजा लाड, वाशिम यांनाही अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »