नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्यानंतर आता सामान्यांना सरकारने आणखी एक झटका दिला आहे. ८ एप्रिलपासून गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे. सरकारने घरगुती वापरासाठीचा एलपीजी गॅस सिलिंडर ५० रुपये महाग केल्याचे जाहीर केले आहे. ८ एप्रिलपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. ७ एप्रिल रोजी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली.

पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय किंमती वाढत आहेत. त्यामुळे ८ एप्रिलपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये ५० रुपयांची वाढ केली जाते आहे. स्वयंपाकाला लागणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत असे त्यांनी जाहीर केले आहे. घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे. सध्या दिल्लीत गॅस सिलिंडर ८०३ रुपयांना उपलब्ध आहे. किमती वाढल्यानंतर ही किंमत ८५३ रुपये होईल. तर मुंबईत हीच किंमत आधी ८०२.५० रुपये होती, ती आता ८५२.५० रुपये होईल.
उज्ज्वला लाभार्थ्यांनाही फटका
गॅस सिलिंडर दरवाढीचा उज्ज्वला लाभार्थ्यांनाही फटका बसला आहे. उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत ५०३ रुपयांना मिळणारा सिलिंडर आता ५५३ रुपयांना मिळणार आहे, तर ही योजना सोडून असलेला एक सिलिंडर ८०३ रुपयांवरुन ८५३ रुपये इतका झाला आहे.
प्रमुख शहरांमध्ये घरगुती सिलेंडरच्या किंमती (रुपयांमध्ये)
शहर जुने दर. नवीन दर
दिल्ली ८०३. ८५३
मुंबई ८०२.५० ८५२.५०
कोलकाता ८२९. ८७९
चेन्नई ८१८. ८६८
भोपाळ. ८०८.५०. ८५८.५०
जयपूर. ८०६.५०. ८५६.५०
पाटणा ९०१. ९५१
रायपूर ८७४ ९२४