dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

माहोरा नाफेड केंद्रावर शेतकऱ्यांची लूट; आक्रमक पावित्र्यानंतर केंद्र चालकाची माफी

माहोरा : येथील नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन आणि मका विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची केंद्र चालकाकडून आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ‘चाळणी आणि गाळणी’च्या नावाखाली प्रति क्विंटल मागे दीडशे रुपये उकळले जात असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी केंद्रावर धडक दिली.

माहोरा : येथील नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन आणि मका विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची केंद्र चालकाकडून आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ‘चाळणी आणि गाळणी’च्या नावाखाली प्रति क्विंटल मागे दीडशे रुपये उकळले जात असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी केंद्रावर धडक दिली. शेतकऱ्यांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे केंद्र चालकाने अखेर माफी मागितली असून, घेतलेले पैसे परत करण्याचे मान्य केले आहे.

माहोरा येथील नाफेड केंद्रावर दररोज सुमारे एक हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी केली जात होती. मात्र, सोयाबीन स्वच्छ करणे, चाळणे आणि वजनाच्या नावाखाली प्रत्येक शेतकऱ्याकडून प्रति क्विंटल दिडशे रुपयांची सक्तीची वसुली ॲग्रीटच फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमीटेड खरेदी केंद्राकडून केली जात होती. एका शेतकऱ्याकडे साधारणपणे १० ते १५ क्विंटल सोयाबीन असते, या हिशोबाने शेतकऱ्यांची लाखो रुपयांची लूट होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जोपर्यंत केंद्र चालक शेतकऱ्यांकडून बेकायदेशीर पैसे घेणे थांबवत नाही, तोपर्यंत खरेदी बंद ठेवा, अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी खरेदी रोखून धरली. तसेच, ही लूट न थांबल्यास जिल्हाधिकारी आणि पणन महासंघ (छत्रपती संभाजीनगर) कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही सरपंच मंगेश लहाने यानी दिला. या आंदोलनावेळी ग्रामपंचायत सरपंच मंगेश लहाने, हर्षल जाधव, पप्पू डुकरे, दीपक लहाने, योगेश औटी, अंकुश जाधव, अभय जाधव, गजानन कोरडे, अभिजीत थारेवाल, सुधाकर वाघ, ज्ञानेश्वर शेजुळ, पुंडलीक कोरडे, राजेंद्र कोरडे, विनोद बोरसे, मिटू कासोद आदींसह शेतकरी उपस्थित होते.

माफीनामा आणि आश्वासन

शेतकरी आणि पुढाऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे हतबल झालेल्या केंद्र चालक चव्हाण यांनी शेतकऱ्यांसमोर माफी मागितली. तसेच, मी घेतलेले अतिरिक्त पैसे परत देईन आणि यापुढे हमीभावानेच माल खरेदी करेन, असे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आपली माघार घेतली. जर यापुढे केंद्र चालकाने पुन्हा मनमानी केली, तर येत्या ८ दिवसांत दुसरे खरेदी केंद्र सुरू करण्यात येईल, असा इशारा माजी सभापती भाऊसाहेब जाधव यांनी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top