India’s victory over Australia: भारताने ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवत आयसीसी स्पर्धेतील पराभवाचा हिसका दाखवला. विराट कोहलीच्या शानदार ८४ धावा, श्रेयस अय्यरसह ९४ धावांची भागीदारी, हार्दिक पंड्याच्या स्फोटक षटकार आणि के.एल. राहुलच्या विजयी फटक्याने भारताने हा ऐतिहासिक सामना ४ विकेट्सने जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
दुबई : भारताने ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवत आयसीसी स्पर्धेतील पराभवाचा हिसका दाखवला. विराट कोहलीच्या शानदार ८४ धावा, श्रेयस अय्यरसह ९४ धावांची भागीदारी, हार्दिक पंड्याच्या स्फोटक षटकार आणि के.एल. राहुलच्या विजयी फटक्याने भारताने हा ऐतिहासिक सामना ४ विकेट्सने जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी २६५ धावांचे लक्ष्य दिले होते. भारताच्या डावाची सुरुवात काहीशी डळमळीत झाली होती, कारण दोन महत्त्वाच्या विकेट्स लवकर गेल्या. मात्र, त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी ९८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. विराटने ९८ चेंडूत ५ चौकारांसह ८४ धावा केल्या, तर श्रेयस अय्यरने ४५ धावा करत मोलाची साथ दिली. अक्षर पटेलनेही २७ धावांची खेळी करत भारताला स्थैर्य दिले. हार्दिक पंड्याने ३ षटकार आणि १ चौकार मारत २८ धावा फटकावल्या. शेवटी के.एल. राहुलने ४२ धावा करत नाबाद राहून सामना भारताच्या पारड्यात टाकला. या विजयासह भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम फेरीत सलग तिसऱ्यांदा प्रवेश केला आहे. विराट कोहलीला सामन्याचा सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. भारताने या विजयाने आपली दमदार कामगिरी सिद्ध केली असून अंतिम फेरीत देखील अशाच प्रदर्शनाची अपेक्षा आहे.
भारताची भेदक गोलंदाजी
ऑस्ट्रेलियाचा डाव स्टीव्ह स्मिथ आणि अॅलेक्स कॅरी यांच्यावर अवलंबून होता. स्मिथने ९६ चेंडूत ७३ धावा, तर कॅरीने ५७ चेंडूत ६१ धावा काढल्या. मात्र, इतर फलंदाजांना भारतीय गोलंदाजांसमोर तग धरता आला नाही. मोहम्मद शमीने १० षटकांत ४८ धावांत ३ विकेट्स घेत आघाडीवर राहिला. त्याला वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी २ विकेट्स मिळवून उत्तम साथ दिली. हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. कुलदीप यादवला मात्र यावेळी यश मिळाले नाही.