India’s victory against Pakistan: विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानविरूद्ध ६ विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे. या विजयासोबतच भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे, तर यजमान पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. भारताने पाकिस्तानकडून २०१७ च्या फायनलमधील विजयाचा बदला घेतला घेतला आहे.
दुबई : विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानविरूद्ध ६ विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे. या विजयासोबतच भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे, तर यजमान पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. भारताने पाकिस्तानकडून २०१७ च्या फायनलमधील विजयाचा बदला घेतला घेतला आहे.
विराट कोहलीने १११ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद १०० धावा करत आपले ५१ वे वनडे शतक पूर्ण केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पुन्हा एकदा २४२ धावांचे लक्ष्य कोणत्याही अडचणीशिवाय जबरदस्त पद्धतीने पूर्ण केले. टीम इंडियाच्या या विजयाचा स्टार विराट कोहली होता, ज्याने उत्कृष्ट शतक झळकावून आपल्या पुनरागमनाचा डंकाही वाजवला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा पाचवा सामना दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघात खेळवण्यात आला. क्रिडा जगतातील सर्वात मोठ्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ६ विकेटनं पराभव केला आहे. या विजयासह भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. पाकिस्ताननं दिलेल्या २४२ धावांचं लक्ष्य भारतानं ४३व्या षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. या सामन्यात भारताकडून विराट कोहलीनं नाबाद (१००) शतकी खेळी करत भारताला एकहाती विजय मिळवून दिला.
कोहलीचं चॅम्पियन्स ट्रॉफीत पहिलं शतक
विराट कोहलीनं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात पहिलंच शतक झळकावलं आहे. याआधी त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक झळकावता आलं नव्हतं. त्यानं या सामन्यात १११ चेंडूत १०० धावा केल्या, ज्यात ७ चौकारांचा समावेश होता. त्याच्या फलंदाजीसमोर पाकिस्तानी गोलंदाज टिकू शकले नाहीत. शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रौफ यांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आलं. परिणामी भारताचा विजय सुकर झाला.
51st ODI Century
Updates
https://t.co/llR6bWyvZN#TeamIndia | #PAKvIND | #ChampionsTrophy | @imVkohli pic.twitter.com/soSfEBiiWk
— BCCI (@BCCI) February 23, 2025
कोहली आणि अय्यर यांची उत्कृष्ट खेळी
रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारतीय संघाला जलद सुरुवात दिली. रोहितनं १५ चेंडूत २० धावा केल्या. त्याच्याशिवाय शुभमन गिलनं ४६ धावा केल्या. विराट कोहली भारतीय संघासाठी सर्वात मोठा हिरो ठरला आणि त्यानं नाबाद १०० धावा केल्या. त्याला श्रेयस अय्यरनं चांगली साथ दिली ज्यानं ५६ धावांचं शानदार अर्धशतक झळकावलं. या खेळाडूंमुळंच भारतीय संघ सामना जिंकण्यात यशस्वी झाला. कोहली आणि अय्यर यांच्याविरुद्ध पाकिस्तानी गोलंदाज मोठे अपयशी ठरले आणि त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही. या दोन्ही फलंदाजांनी अतिशय काळजीपूर्वक फलंदाजी केली आणि धावा करण्यात कोणतीही घाई दाखवली नाही.
पाकिस्तानी फलंदाजांची खराब कामगिरी
पाकिस्तानी संघाची सुरुवात चांगली झाली. जेव्हा संघानं फक्त १० षटकांत ५२ धावा केल्या होत्या. पण पॉवरप्लेमध्येच बाबर आझम (२३ धावा) आणि इमाम उल हक (१० धावा) पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर, कर्णधार मोहम्मद रिझवान आणि सौद शकील क्रीजवर उतरले. या दोन्ही खेळाडूंनी खूप हळू फलंदाजी केली. रिझवाननं ७७ चेंडूत फक्त ४६ धावा केल्या, ज्यात त्याला फक्त तीन चौकार मारता आले. नंतर, शकीलनं जलद खेळण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यानं 76 चेंडूत ६२ धावा केल्या. खुसदिल शाहनं 38 धावा केल्या. पाकिस्तानी संघ पूर्ण ५० षटकंही खेळू शकला नाही आणि ४९.४ षटकांत फक्त २४१ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.