जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनाला गालबोट, शेतकऱ्याने पूर्णा नदीत घेतली जलसमाधी : स्वातंत्र्यदिनी शेतकऱ्यांचा जिगाव प्रकल्पाच्या मोबदल्यासाठी करण्यात आले आंदोलन 

जळगाव जामोद : स्वातंत्र्य दिनाला जिल्ह्यात गालबोट लागले असून जिगाव प्रकल्पामध्ये गेलेल्या शेतीचा मोबदला मिळवण्यासाठी 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये एका शेतकऱ्याने जलसमाधी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना जिगाव प्रकल्प येथे उघडकीस आली आहे.

जळगाव जामोद : स्वातंत्र्य दिनाला जिल्ह्यात गालबोट लागले असून जिगाव प्रकल्पामध्ये गेलेल्या शेतीचा मोबदला मिळवण्यासाठी 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये एका शेतकऱ्याने जलसमाधी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना जिगाव प्रकल्प येथे उघडकीस आली आहे.

         जिगाव प्रकल्पाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. जिगाव प्रकल्पांमध्ये हजारो शेतकऱ्यांच्या शेती धरणात गेलेल्या असून अद्याप पर्यंत अनेक शेतकऱ्यांना त्याचा मोबदला शासनाकडून मिळालेला नाही. शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला या अगोदर मोबदला न मिळाल्यास जलसमाधी आंदोलन करण्याचा निवेदनाद्वारे इशारा दिला होता. दरम्यान जिगाव प्रकल्पामध्ये गेलेल्या शेतीचा मोबदला मिळावा यासाठी जळगाव जामोद तालुक्यातील गौलखेड येथील शेतकऱ्यांनी जिगाव प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आढळ गावाजवळ पूर्णा नदी पात्राजवळ जलसमाधी आंदोलन केले होते. दरम्यान आंदोलनामध्ये गौलखेड येथील शेतकरी विनोद पवार याने पूर्णा नदीमध्ये उडी घेऊन जलसमाधी घेतली. यावेळी आंदोलक आणि प्रशासनाची एकच तारांबळ उडाली होती. आंदोलक विनोद पवार काही वेळातच नदीपात्रात बुडून बेपत्ता झाले. बराच वेळ ते पाण्याच्या बाहेर न आल्याने तातडीने महसूल विभागाच्या एनडीआरएफ टीमला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी जळगाव जामोद पोलीस आणि एनडीआरएफ पथक नदीपात्रात सदर बेपत्ता आंदोलकाचा शोध घेत असून वृत्तलेपर्यंत त्याचा मृतदेह सापडला नव्हता. जमिनीचा मोबदल्या मिळवण्यासाठी विनोद पवार यांनी स्वतःचे बलिदान दिल्याचे यावेळी बोलल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »